ग्रामसेवक नाही आता ग्रामपंचायत अधिकारी ✅✅| ग्रामपंचायत अधिकारी नवीन GR #gramsevak Bharti GR 2025
१) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण-२०१९/ प्र.क्र.७९६/ आस्था-७, दिनांक ११ मे, २०२२
प्रस्तावना :-
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्वाचे पद व घटक आहे. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिध्द सचिव म्हणून कामकाज पाहतात. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने सदर दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करणेबाबत वाचा येथील शासन निर्णयान्वये तज्ञ समिती नेमण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे “ग्रामपंचायत अधिकारी” असे नामाभिदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. शासन निर्णय:-
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) ही दोन्ही पदे एकत्रित करून एस-८ (२५५००-८११००) या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिदान “ग्रामपंचायत अधिकारी” असे करण्यात येत आहे.
२. सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदांचे वेतन संरक्षित करुन व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करुन तद्नंतर रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिदान असणाऱ्या एस-८ वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात याव्यात.
३.ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १० वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-१४ (३८६००-१२२८००), २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहायक गट विकास अधिकारी एस-१५ (४१८००-१३२३००) व ३० वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी एस-२० (५६१००-१७७५००) असा अनुज्ञेय राहील.
४.ग्रामपंचायत अधिकारी या पदांच्या पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित पदोन्नती साखळी नुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय होतील. सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ अनुज्ञेय झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही अशा कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळी प्रमाणे लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत व तद्नंतरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चिती करुन अदा करण्यात यावेत.
५.सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवाज्येष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवाज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तयार करावी. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सेवाज्येष्ठतेमध्ये बदल होणार नाही याची दक्षता घ्यावी. ६.ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल.
७.सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.४९५/२०२४/व्यय-१५, दि.२६.७.२०२४ अन्वये प्राप्त अभिप्राय व त्यानुषंगाने दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक <२०२४०९२४१४४८५३०५२० > असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
C
Digitally signed by SEEMA BABAN JADHAV
Date: 2024.09.24 17:46:23 +05'30'
(सीमा जाधव)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) मा. राज्यपाल यांचे सचिव
२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव
४) मा.विरोधी पक्ष नेता वि.सभा/परिषद यांचे स्वीय सहाय्यक
५) मा. मुख्य सचिव यांचे खाजगी सचिव
६) मा.मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
७) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई
८) सर्व विभागीय आयुक्त
९) सर्व जिल्हाधिकारी
१०) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
११) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१२) सर्व उपायुक्त (विकास / आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालये
१३) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
१४) सर्व सह/उप सचिव, अवर सचिव, कार्यासन अधिकारी, ग्रामविकास विभाग
१५) अपर मुख्य सचिव (ग्राम विकास) यांचे स्वीय सहायक
१६) माहिती तंत्रज्ञान कक्ष (ग्रा.वि.वि), बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई १७) निवडस्ती, कार्यासन आस्था -७
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन सदर पदाचे नामाभिदान “ग्रामपंचायत अधिकारी” करणेबाबत.
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१९/प्र.क्र.७९६/आस्था-७
बांधकाम भवन, मर्झबान पथ, २५,
फोर्ट, मंत्रालय, मुंबई ४००००१
दिनांक: २४ सप्टेंबर, २०२४
![]() |
| ग्रामसेवक नाही आता ग्रामपंचायत अधिकारी ✅✅| ग्रामपंचायत अधिकारी नवीन GR #gramsevak Bharti GR 2025 |
![]() |
| ग्रामसेवक नाही आता ग्रामपंचायत अधिकारी ✅✅| ग्रामपंचायत अधिकारी नवीन GR #gramsevak Bharti GR 2025 |
![]() |
| ग्रामसेवक नाही आता ग्रामपंचायत अधिकारी ✅✅| ग्रामपंचायत अधिकारी नवीन GR #gramsevak Bharti GR 2025 |



